
Ubon ने नुकताच 2,499 रुपयांचा नवीन वायरलेस इयरफोन लॉन्च केला आहे. तुम्ही हे नवीन इयरफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता, तेही फक्त 1,399 रूपयांमध्ये. विशेष म्हणजे Ubone चा वायरलेस इयरफोनवरून तुम्ही 100 तासांपर्यंत नॉन-स्टॉप गाणी ऐकू शकता.

हे नवीन वायरलेस इयरफोन तुम्हाला फक्त सर्वोत्तम मनोरंजनाचा अनुभवच देत नाही तर सोबत 1,000 तासांचा स्टँडबाय वेळ देखील देते. तुम्हाला जर कुठे जायचे असेल तर तुम्ही त्याला सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही त्यात तुमचे आवडते व्हॉईस असिस्टंट देखील जोडू शकता.

या नवीन इयरफोन्समध्ये तुम्हाला व्हायब्रेशन अलर्ट सिस्टम देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींसाठी अलर्ट मिळण्यास मदत होईल. ते तुम्हाला इनकमिंग कॉल्स आणि नोटिफिकेशन्सबाबत ताबडतोब अलर्ट देईल.

CL-35 Bulletमध्ये मिळणाऱ्या टच कंट्रोल फीचर्ससह तुम्ही म्युझिक प्लेबॅक, व्हॉल्यूम किंवा सेटिंग्ज सहजपणे मॅनेज करू शकता. तसंच मॅग्नेटिक फीचरद्वारे CL-35 ला चालू-बंद केले जाऊ शकते. हे एक स्पोर्टी डिझाइनसह हलक्या वजनाचे इअरफोन आहे.

Ubon ने नवीन CL-35 वायरलेस नेकबँड लॉन्च केला आहे. नवीनतम इयरफोन्स वेगळे करण्यायोग्य बॅटरी, फुल टच कंट्रोल फंक्शन आणि 100 तास खेळण्याचा वेळ यासारख्या वैशिष्ट्यांसह सादर केले गेले आहेत.