
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणता चित्रपट पाहावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. दरम्यान, ओटीटीवर 18+ वयोगटातील प्रेक्षकांसाठी असलेल्या एका चित्रपटाने लक्ष वेधले आहे. हा एक मल्याळम चित्रपट आहे, जो एकदाच पाहता येईल. हा कोणता चित्रपट आहे आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे? या चित्रपटाची कथा नेमकी का. आहे? चला जाणून घेऊया...

चित्रपटाची कथा एका विवाहित महिलेभोवती फिरते. तिचे एका मुलावर प्रचंड प्रेम असते. ती BFच्या मदतीने सासूचा खून करते. त्या रात्रीनंतर तिची सासू जिवंत राहते की नाही, हीच चित्रपटाची मुख्य कथा आहे. या चित्रपटाचे नाव 'उडल' असे आहे. मल्याळममध्ये रिलीज झालेल्या 'उडल' (Udal) ची कथा अंगावर काटा आणणारी आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम ओटीटीवर उपलब्ध आहे.

'उडल' चित्रपटात सतत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. विशेषतः इंटरवलचा सीन प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. हा हॉरर चित्रपट नाही, पण त्यात हॉरर चित्रपटांसारखे थ्रिलिंग क्षण आहेत, जे चित्रपटाचे प्लस पॉइंट आहे. दुर्गा कृष्णा, दयान श्रीनिवासन आणि इंद्रन्स हे तीन मुख्य पात्र आहेत. एक घर, एक रात्र आणि फक्त तीन पात्र. त्या घरात बिछान्यावर पडलेली सासू, पाहू-ऐकू न शकणारा सासरा आणि त्याची सून जी सासूच्या काळजीने वैतागली आहे. सुनेचा एक प्रेमी आहे आणि एका क्षणी ती आपल्या प्रेमीच्या मदतीने सासूची हत्या करते. त्यानंतरच्या घटनाच चित्रपटाची कथा बदलते.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला प्रेक्षक आपल्या अक्षरश: टक लावून पाहतात. पहिल्या हाफमध्ये हत्या होते, तर दुसऱ्या हाफमध्ये बदल्याची कथा आहे. सासरा जो पाहू आणि ऐकू शकत नाही तो कसा बदला घेतो, ही दुसऱ्या हाफची रोचक कथा आहे. चित्रपटाचा बॅकग्राउंड म्यूजिक आणि कॅमेरा वर्क थ्रिलिंग क्षणांना आणखी प्रभावी बनवतात. दुसऱ्या हाफमध्ये बहुतांश सीन अंधारात चित्रीत केले आहेत, जे प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरतात.

क्राइम-थ्रिलर जॉनरच्या शौकीनांसाठी 'उडल' एक मस्ट वॉच चित्रपट आहे. त्यात हिंसक सीन जास्त आहेत, म्हणून हा प्रौढांसाठी आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम ओटीटीवर पाहू शकता. रथीश रघुनंदन दिग्दर्शित हा चित्रपट कंटाळवाणा न होता एकदाच पाहता येईल. सुरुवातीला थोडी हळू गतीने चालणारी कथा एका क्षणी वेग पकडते आणि त्याचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे.