वाट कशाची बघताय? तातडीने दुष्काळ जाहीर करा आणि…उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 5 मोठ्या मागण्या!

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारला घेरलंय. त्यांनी शेतकरी हिताच्या काही मागण्यादेखील केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केलीय.

| Updated on: Sep 24, 2026 | 3:52 PM
1 / 5
सध्या राज्यभरात दुष्काळाची स्थिती आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील उभे पीक जळून खाक झाले आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

2 / 5

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारला घेरलंय. त्यांनी शेतकरी हिताच्या काही मागण्यादेखील केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केलीय.

3 / 5

शेतकऱ्यांची स्थिती खूपच बिकट आहे. त्यांना तत्काळ मदत मिलणं गरजेचं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेनेच्या मदतीने मदत केंद्रे उभारली जावीत, असेही ठाकरे यावेळी म्हणालेत.

4 / 5

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना कामाला लावलं पाहिजे. दुष्काळात केंद्र सरकारनेही मदत केली पाहिजे. तीन महसलू विभागात मंत्रिमंडळ बैठका बोलवून निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

5 / 5

सरकार जी मदत करणार आहे. ती 40-45 दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या हातात आली पाहिजे, अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केलीय. अमित शहा यांनी राज्यात येऊन बघितलं पाहिजे. त्यांच्याकडे पक्ष फोडायला पैसे आहेत मग त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us