Photo: यूकेच्या मंत्री एलिझाबेथ ट्रस यांना मुंबई महापालिकेची भूरळ; पाहा फोटो
यूनायटेड किंग्डमच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव एलिझाबेथ ट्रस यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. (UK Minister Elizabeth Truss Visit BMC Headquarter)

aaditya thackeray

यूनायटेड किंग्डमसोबतचे व्यापार, वाणिज्यिक संबंध आणखी दृढ करण्याविषयी चर्चा करण्यासह महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक पुरातन वारसा असलेली इमारत पाहण्यासाठी ट्रस यांनी ही भेट दिली.

ट्रस आणि गिमेल यांचे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागत केल्यानंतर त्यांना ऐतिहासिक इमारतीची माहिती देण्यात आली. मुख्यालयाच्या आत असलेला सोनेरी घुमट, महानगरपालिका सभागृहाची या शिष्टमंडळाने पाहणी केली.

त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह पुरातन वारसा तज्ज्ञ भरत गोठोस्कर यांनी ऐतिहासिक माहिती दिली. तसेच इमारतीचे वैशिष्ट्य उलगडून दाखवले.

मुंबईसह महाराष्ट्र राज्यासमवेत यूनायटेड किंग्डमचे वाणिज्यिक आणि व्यापार विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह नवीन संधी शोधून त्यास बळकटी देण्यावर द्विपक्षीय सहमती झाली.

ट्रस यांना किशोरी पेडणेकर यांनी स्नेहाचे प्रतीक म्हणून साडी भेट दिली. तसेच मुंबई महानगरपालिका बोधचिन्ह असलेले पदक आणि नागरी दैनंदिनी (डायरी) प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते या शिष्टमंडळाचा सत्कार करण्यात आला.