
युक्रेनची राजधानी कीववर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे. सॅलेटाईल फोटोंमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता तर चक्क 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा हा कीवच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसून आलं आहे.

याआधीची एक ताफा रशियानं कीवच्या दिशेनं पाठवला होता. तो तीन मैल लांब होता. मात्र आताचा हा ताफा दुप्पटच नाही तर, तब्बल दहा पटपेक्षाही जास्त मोठा आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये तणाणावर चर्चाही करण्यात आली होती. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता.

युक्रेनच्या राजधानीवर रशियानं हल्लाबोल केलाय. गेल्या काही दिवसांपासून सॅटेलाईन इमेजिंगचं काम करणारी मॅक्सर टेक्नोलॉजी कडून याबाबतचे फोटोही समोर आणले जात आहेत. यावेळीही मॅक्सर टेक्नॉलॉजीनं 64 किलोमीटर लांब रशियन सैन्याचा ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं दृश्यं टिपलंय. हा ताफ्यासोबत काही बेचिराख झालेली आणि आग लागलेली घरंही दिसून आली आहेत. हा ताफा सध्या नॉर्थवेस्टपासून जवळपास 45 किलोमीटर लांब ठेवण्यात आला आहे.

अन्तोनोव्ह विमानतळापासून सुरु होणारा हा ताफा प्रिबिर्स्क पर्यंत असल्याचं सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतंय. या ताफ्यात शेकडो रनगाडे, अर्टलरी गन मशीन्स, आणि सैन्याची वाहनं दिसत आहेत.

यूक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याचा 64 कि.मी.चा ताफा