
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अलास्कामध्ये चर्चा झाली. पहिल्याच बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यावर एकमत झालं नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सार्थक ठरल्याच चित्र आहे. (Photo- White House)

या बैठकीकडे सगळ्या जगाच लक्ष लागलं होतं. कारण डोनाल्ड ट्रम्प बोललेले की, चर्चा सकारात्मक वाटली नाही, तर मी दोन मिनिटात बैठकीतून बाहेर निघेन. पण ही चर्चा तब्बल तीन तास चालली. भले बैठकीत ठोस काही ठरलं नाही. पण अजून निर्बंध लागणार नाहीत, निदान हा तरी विश्वास मिळाला.

ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची आवश्यकता नाहीय. ते म्हणाले की, दोन किंवा तीन आठवड्यात या मुद्यावर ते पुन्हा विचार करु शकतात. भारत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे त्रस्त आहे. उत्पन्न आणि रोजगार दोन्ही संकटात आहे. Getty Images

फॉक्स न्यूजशी बोलताना नव्या टॅरिफबद्दल ट्रम्प म्हणाले की, आज जे झालं, त्यामुळे मला असं वाटतं की, या बद्दल जास्त विचार करण्याची आवश्यकता नाहीय. आता मला कदाचित दोन ते तीन आठवड्यानंतर यावर विचार करावा लागेल. पण सध्या या बद्दल विचार करण्याची आवश्यकता नाहीय. Andrew Harnik/Getty Images
