
प्रत्येकाला काही ना काही वस्तू घेण्याची आवड असते. मात्र पैशांचं गणित जुळत नसल्याने क्रेडिट कार्डचा पर्याय शोधला जातो. पण क्रेडिट कार्ड वापरताना किंवा त्यासाठी अप्लाय करताना काळजी घेणं गरजेचं आहे . (Unsplash)

क्रेडिट कार्ड वापरत असाल तर वेळेतच पैसे भरा. अन्यथा तुम्हाला लेट फी भरावी लागू शकते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. (Unsplash)

आपल्या क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त खर्च करू नका. कारण बँक तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकते. प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डवर एका लिमिटपर्यंत खर्च करण्याची मुभा असते. (Unsplash)

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप मारता तेव्हा तुमच्या खात्यातून तात्काळ पैसे जातात. जर चुकीने कार्डमधून पैसे गेले तर पैसे रिफंड होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागतो. (Unsplash)

क्रेडिट कार्डने कधीच एटीएममधून पैसे काढू नये. रोख रक्कम काढल्यास क्रेडिट पिरियड मिळत नाही. त्यामुळे इंटरेस्ट भरावा लागू शकतो. हा इंटरेस्ट पैसे काढल्या दिवसापासून लागू होतो. (Unsplash)