
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत असातत, त्याला हजारो-लाखो लाईक्सही मिळतात. वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेता तंदुरुस्त आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवडतो. गेल्या काही काळात अभिनेत्रीची लोकप्रियता दुप्पट झाली आहे.

अलिकडेच श्वेता मॉरिशसच्या ट्रीपला गेली होती. तिथून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. श्वेता मॉरिशसच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिने त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत. यासोबतच तिने तिच्या आयुष्यातील एक मोठे रहस्यही उलगडले.

विमानाने प्रवास करताना, तिचा ट्रॅव्हल पार्टनर कोण आहे, तिला कोणासोबत प्रवास करायला आवडतं हे तिने अलीकडेच उघड केलं की . अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये ती विमानातून प्रवास करताना दिसत आहे.

पुस्तके आणि बोर्डिंग पास, प्रवासासाठी परफेक्ट साथीदार, असं फोटोंसोबत श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिलं. यासोबतच श्वेताने विमानातून काढलेला तिचा सेल्फीही शेअर केला आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहे.

अलिकडेच तिने तिच्या मॉरिशस ट्रिपचे लेटेस्ट फोटो शेअर केले जे व्हायरल झाले. या फोटोंमध्ये अभिनेत्रीला पाहून चाहत्यांनी तिचं मनभरून कौतुक केलं. वय हे श्वेतासाठी फक्त एक आकडा आहे, अशी कमेंट एकाने केली. ही खरी मॅच्युअर ब्युटी आहे, अशी कमेंटही दुसऱ्याने केली.

श्वेताचे हे फोटो 4 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत. याशिवाय, इन्स्टाग्रामवरही या अभिनेत्रीचे चाहते खूप आहेत. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे 5.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत,यावरून तिची लोकप्रियता कळते.

श्वेता तिवारीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची अजय देवगणच्या मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन' मध्ये दिसली होती. याशिवाय ती ओटीटीवरही सक्रिय आहे. तिची 'इंडियन पोलिस फोर्स' ही मालिका लोकांना खूप आवडली होती.