AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Tatwawadi: पाणावलेल्या डोळ्यांनी तुला निरोप देणं..; वैभव तत्त्ववादीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Vaibhav Tatwawadi: अभिनेता वैभव तत्त्ववादीच्या आजीचं निधन झालं असून सोशल मीडियावर त्याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. नि:स्वार्थ प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजावून दिलास, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Sep 04, 2026 | 8:23 AM
Share
मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादीच्या आजीचं निधन झालं असून सोशल मीडियावर त्याने अत्यंत भावुक पोस्ट लिहिली आहे. आजीसोबतच्या आठवणींना उजाळा देताना वैभवने तिच्या प्रेमळ स्वभावाचं आणि कुटुंबाशी असलेल्या नात्याचं वर्णन केलं. वैभवचं त्याच्या आजीसोबत खूप जवळचं नातं होतं.

1 / 6
वैभवने त्याच्या पोस्टची सुरुवात आजीला प्रेमळ शब्दांत श्रद्धांजली वाहून केली. नागपूरला विमानातून उतरताना पहिल्यांदाच मन खूप जड झाल्याचंही त्याने सांगितलं. आजीने व्हिडीओ कॉलदरम्यान ज्या पद्धतीने त्याला निरोप दिला, त्यातून तिचा शेवट जवळ आल्याची जाणीव झाल्याचं वैभवने लिहिलं. मात्र, ही गोष्ट स्वीकारणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं.

2 / 6
वैभवच्या आजीचा सोशल मीडियावरही अनेकांशी अप्रत्यक्षपणे संबंध आला होता. 'तुझी आजी खूप क्यूट आहे,' अशा अनेक कमेंट्स आणि मेसेजेस त्याला मिळायचे. विशेष म्हणजे, आजीलाही हे मेसेज वाचायला खूप आवडायचे, असं वैभवने सांगितलं. तिच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे ती सोशल मीडियावर ओळख नसतानाही अनेकांच्या मनात स्थान निर्माण करू शकली होती.

3 / 6
आजीच्या स्वभावाचं वर्णन करताना वैभवने लिहिलं की, ती एखाद्या खोलीत प्रवेश करताच तिथल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करून घ्यायची. तिच्या या गुणामुळे आपण नेहमीच प्रभावित झालो होतो, असं त्याने म्हटलं. 'तुझ्यासारखी आजी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे,' अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

4 / 6
यासोबतच वैभवने त्याच्या आई-वडिलांचंही कौतुक केलं. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी नागपूर सोडलं नाही. वैभवच्या चित्रपटांच्या प्रीमिअरलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत, कारण आजीला एकटं सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. नर्स आणि घरातील मदतनीस असतानाही त्यांनी आजीची साथ सोडली नाही.

5 / 6
आजीच्या शेवटच्या क्षणी आई तिच्या बाजूला होती आणि भगवद्गीतेचे श्लोक म्हणत होती, असंही वैभवने भावूकपणे सांगितलं. अखेरच्या निरोपावेळी डोळ्यांत अश्रू असल्याचं सांगत त्याने आजीचे आभार मानले आणि 'नि:स्वार्थ प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजावून दिलास,' अशी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केली.

6 / 6
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी