इंटिमेट सीन्सबाबत वैदेही परशुरामीने सांगितली ‘ती’ गोष्ट; म्हणाली, “मेकर्सला…”
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीने इंटिमेट सीन्स आणि वैयक्तिक सीमांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. सिनेमा निवडताना ती कोणत्या गोष्टींचा विचार करते? निर्मात्यांना ती आधीच काय स्पष्ट सांगते? जाणून घ्या वैदेहीने नेमकं काय म्हटलं…

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच उत्कृष्ट नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. साधेपणामुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. सिनेमा निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करते, याबाबत तिने नुकतंच स्पष्ट मत मांडलं.
वैदेहीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, इंटिमेट सीन्सबाबत ती पहिल्यापासूनच कम्फर्टेबल नाही. त्यामुळे अशा दृश्यांसाठी ती सध्या थेट नकार देते. मात्र, असे सीन्स करणे चुकीचे आहेत, असं तिचं मत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
“कलाकार म्हणून मला ते एक्सप्लोर करण्याची इच्छा अजून झालेली नाही. मी हे कधीच करणार नाही असंही म्हणत नाही, पण मला आत्ता त्याची गरज वाटत नाही,” असं वैदेही म्हणाली. तिच्या मते, प्रत्येक कलाकाराचा आपल्या कामाबाबत वैयक्तिक निर्णय असू शकतो.
प्रोजेक्ट साइन करण्यापूर्वी ती दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत या मुद्द्यांवर आधीच चर्चा करते. जर एखाद्या भूमिकेसाठी इंटिमेट सीन्स आवश्यक असतील आणि त्यात बदल शक्य नसेल, तर ती नम्रपणे तो प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेते.
कपड्यांच्या बाबतीतही वैदेहीचा हाच स्पष्ट दृष्टिकोन आहे. “मी काही गोष्टी करणार नाही, त्या आधीच क्लिअर करते. त्यात मी बसत असेल तर ग्रेट, नाहीतर मी तो प्रोजेक्ट सोडते,” असं सांगत तिने आपल्या वैयक्तिक सीमांबाबत स्पष्ट भूमिका मांडली.