
वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंब चांगलेच अडचणीत सापडले आहे. वैष्णवीचा पती, दीर, नणंद, सासू-सासरे या सर्वांनाच बेड्या ठोकण्यात आल्यात. असे असतानाच आता हगवणे कुटुंबाच्या घरावर शेणफेक करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने राजेंद्र हगवणे याच्या घरावर शेणफेक केली आहे.

पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे, हगवणे कुटुंबीयांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा महिला आंदोलकांनी दिल्या.

मुळशी तालुक्यातील भूकुम येथे राजेंद्र हगवणे याचे घर आहे. याच घरावर शेणपेक करण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण हगवणे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा सध्या तपास चालू आहे.