
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय. तर हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी मात्र न्यायालयात बाजू मांडताना गंभीर स्वरुपाचे दावे केले आहेत.


प्लास्टिकच्या छडीने केलेली मारहाण याला हत्या म्हणायचं का? असा सवालही हगवणे कुटुंबाच्या वकिलाने उपस्थित केला आहे.

नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? असाही सवाल हगवणेंच्या वकिलाने न्यायालयात उपस्थित केला आहे.

दरम्यान, वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना एका दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान, हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलेल्या या अजब युक्तिवादानंतर पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.