Trump-Putin Alaska Meeting : रशियाचे पाच चाणक्य, पडद्यामागे राहून असा गेम खेळला की, पहिल्या राऊंडमध्ये पुतिन ट्रम्पवर पडले भारी

Trump-Putin Alaska Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक झाली. या बैठकीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय ही बैठक फिकी ठरली. तीन तास बंद खोलीत चर्चा झाली. दोन्ही नेते बाहेर आले, त्यावेळी फक्त 12 मिनिटं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले. या सगळ्या बारा मिनिटात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प फक्त 3 मिनिट 20 सेकंदच बोलले.

| Updated on: Aug 16, 2025 | 2:19 PM
1 / 6
पुतिन यांची सर्व तयारी स्पष्टपणे दिसून येत होती. पुतिन यांच्या आत्मविश्वासामागे आहे त्यांची डेलिगेशनची टीम. त्यातले 5 धुरंधर, जे या मीटिंगसाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. टीममध्ये जुने कूटनितीक खेळाडू, आर्थिक रणनितीकार आणि पुतिन यांच्या विश्वासू लोकांचा सहभाग होता. त्यामुळे अलास्कामध्ये आलेले पुतिन ट्रम्प यांच्यावर भारी पडले. ट्रम्प फक्त धमक्या देत राहिले. या बैठकीमागची रणनिती आणि त्याची तयारी समजून घ्या.

2 / 6
1950 मध्ये मॉस्कोमध्ये जन्मलेले सर्गेई लावरोव रशियाचे जुने आणि शक्तीशाली परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखले जातात. 2024 पासून या पदावर असताना त्यांनी सातत्याने जगासमोर युक्रेन युद्ध पाश्चिमात्य देश चालवत असल्याच म्हटलं. त्यांची कठोर आणि आक्रमक भाषा पुतिन यांच्या परराष्ट्र धोरणाची ओळख बनलीय.

3 / 6
किरिल दिमित्रिएव यांची ओळख एका डील मेकरची आहे. ते 2011 पासून रशियाच्या sovereign wealth fund (RDIF) प्रमुख आहेत. पुतिन यांचे ते  विश्वासू आहेत. किरिल दिमित्रिएव पाश्चिमात्य निर्बंधांमधून मार्ग काढण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या रणनितीमुळेच निर्बंधाचा सामना करुनही रशिया पुढे गेला. 2025 मध्ये त्यांच्यावर परदेशी गुंतवणूक आणि आर्थिस सहकार्याच्या विशेष दूताची जबाबदारी सोपवण्यात आली. स्टॅनफोर्डमध्ये शिकलेले दिमित्रिएव रशियासाठी नवीन आर्थिक मार्ग खुले करत आहेत.

4 / 6
2024 मध्ये रशियाचे संरक्षण मंत्री बनलेले 66 वर्षीय आंद्रे बेलोउसॉव पेशाने अर्थशास्त्री आहेत. पुतिन यांनी यासाठी त्यांची निवड केली कारण युद्ध मशीनरीच्या खर्चाला आर्थिक शिस्त आणि दक्षतापूर्वक कारभार चालावा. आर्थिक सल्लागार आणि उप पंतप्रधान राहिलेले बेलोउसॉव रशियाच्या सैन्याला टेक्नोलॉजी आणि आर्थिक शिस्तीने संभाळत आहेत.

5 / 6
2011 साली रशियाचे अर्थमंत्री बनलेले एंटोन सिलुआनोव रशियाचे युद्धकाळातील आर्थिक कणा आहेत. बजेट बनवून खर्च नियंत्रित करण्याच्या कठोर उपायोजनांमुळे ते पुतिन यांचे विश्वासू बनले. युद्धाशिवाय रशियाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याच श्रेय त्यांना मोठ्या प्रमाणात जातं.

6 / 6
78 वर्षीय यूरी उशाकोव यांना बॅकस्टेड डिप्लोमॅट म्हटलं जातं. अमेरिकेत ते (1999-2008) पर्यंत रशियाचे राजदूत होते. उशाकोव 2012 पासून पुतिन यांचे वरिष्ठ परराष्ट्र धोरण सल्लागार आहेत. पुतिन यांच्या भेटीची तयारी करणं, संदेश ठरवणं आणि आंतरराष्ट्रीय मंचावर रशियाची प्रतिमा तयार करणं या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. उशाकोव यांचे डावपेच पाश्चिम देशांसाठी डोकेदुखी ठरतात.