मंत्र्याची बायको, ती सारखी सारखी… अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आईबाबत सांगितला ‘तो’ किस्सा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, घटनांचा उलगडा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांचे आई-वडील आणि कुटुंबाबाबत सांगितले.

Varsha Usgaonkar mother
मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या आईबद्दल सांगितले की, माझ्या आईला सारखं सारखं मिटींग, कार्यक्रमांमध्ये जावं लागायचं. ती मंत्र्याची बायको, त्यामुळे नेते म्हणा... मोठी माणसं... गव्हर्नर... त्यांच्याकडे येणं-जाणं होतच राहायचं. त्यामुळे आईला नीटनेटकं राहण्याची सवय होती.
पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, मी आईला नटताना, टापटीप राहताना पाहिलंय, त्यामुळे लहानपणापासून मला इच्छा असायची की मी अशी दिसणार... अशा बांगड्या घालणार... अशा साड्या नेसणार...
माझी आई सारखी सारखी आरशात पाहायची, तिला ते खूप आवडायचं आणि त्यातूनच स्वतःवर प्रेम कसं करावं हे मी शिकले. मलाही तशीच सवय लागली.
गोव्यात जन्मलेल्या वर्षा उसगांवकर यांनी कॉमर्स या शाखेत पदवी घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी खास दोन वर्षे नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत आल्या आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.