
अलीकडे अर्जुन तेंडुलकर चर्चेत होता. त्याने मुंबई संघाची साथ सोडून गोव्याकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. आता मुंबईच्या आणखी एका खेळाडूने अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकलय. हे दोन खेळाडू आहेत, आदित्य तरे आणि वरुन एरॉन. फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये हे दोन सीनियर क्रिकेटर्स आहेत. आता हे दोन्ही क्रिकेटर्स चर्चेत आहेत, कारण त्यांनी आपला संघ बदललाय.

आदित्य तरे मागच्या 16 वर्षांपासून मुंबईसाठी खेळत होता. पुढच्या सीजन मध्ये तो उत्तराखंडकडून खेळताना दिसणार आहे. वरुण एरॉन धोनी सोबत झारखंडकडून खेळायचा. पुढच्या सीजन मध्ये तो बडोद्याकडून खेळेल.

सिद्धेश लाड आणि अर्जुन तेंडुलकरनंतर मुंबईची साथ सोडणारा आदित्य तरे तिसरा क्रिकेटर आहे. मी खोटं बोलणार नाही, असं आदित्य तरे म्हणाला. ज्या पद्धतीने गोष्टी संपल्यात, ते दु:खद आहे. माझ्यासमोर नवीन आव्हान आहे. नवीन संघ, नवीन वातावरण आहे. त्यामुळे मी उत्साहित आहे.

मी 16 वर्ष मुंबईसाठी क्रिकेट खेळलो. अंडर 17 पासून मी मुंबईसाठी क्रिकेट खेळलो. मी आज 34 वर्षांचा आहे. मुंबईकडून खेळताना मला प्रत्येक क्षण अभिमान वाटला.

32 वर्षाच्या वरुण एरॉनने सुद्धा झारखंडची साथ सोडलीय. तो झारखंडकडून 63 फर्स्ट क्लास सामने खेळला. त्याने 167 विकेट घेतल्या.