
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची एंट्री धडकी भरवणारी दाखवली जाते. मात्र, 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हा पारंपरिक ट्रेंड मोडून काढला.

तब्बल 2 तास 25 मिनिटांच्या या चित्रपटात खलनायक नाही तर नायकाचा अभिनय हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुख्य अभिनेत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

हा चित्रपट म्हणजे बदलापुर. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या डार्क अॅक्शन-थ्रिलरचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले होते. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 20 फेब्रुवारी 2026 रोजी 11 वर्षे पूर्ण झाली.

या चित्रपटात वरुण धवन आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर खलनायकाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीने प्रभावी कामगिरी केली होती. याशिवाय दिव्या दत्ता, विनय पाठक, कुमुद मिश्रा आणि जाकिर हुसैन यांसारख्या दमदार कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने खलनायकाची भूमिका साकारली असली तरी नायकाच्या भूमिकेत असलेल्या वरुण धवनने साकारलेला ‘राघव पुरोहित’ची भूमिका इतकी तीव्र आणि धोकादायक भासते की अनेक प्रसंगी तोच अधिक भयावह वाटतो.

रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेल्या वरुण धवनचा या चित्रपटात पूर्णतः वेगळा, अंधारमय आणि सूडाने पेटलेला अवतार पाहायला मिळला. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि त्याच्या कारकिर्दीतील हा एक टर्निंग पॉइंट ठरला. आता Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.