
किचन अग्नीतं प्रतिनिधित्व करतं, बेडरुम पाण्याचं प्रतिनिधित्व करतं... वास्तुशास्त्रानुसार, या दोन विरुद्ध घटकांची एकमेकांसमोर उपस्थिती असणाऱ्या घरातील लोकांमध्ये तणाव, भांडणं आणि मतभेद निर्माण होऊ शकतात. याला ऊर्जेचा संघर्ष मानला जातो, ज्यामुळे घराची शांती भंग होते.

किचनमध्ये तीव्र आग, उष्णता आणि ऊर्जा असते, तर बेडरूम ही शांतता आणि विश्रांतीची जागा असते. जेव्हा हे दोघे समोरासमोर असतात तेव्हा स्वयंपाकघरातील तीव्र ऊर्जा बेडरूमची शांतता भंग करू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये स्वयंपाक करताना निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा, जर ती बेडरूमसमोर असेल तर ती थेट बेडरूममध्ये प्रवेश करू शकते. ही नकारात्मक ऊर्जा कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधांवर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते.

किचन आणि बेडरूम एकमेकांच्या विरुद्ध असल्याने पती-पत्नीमधील नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. आग आणि पाण्यातील संघर्षामुळे परस्पर समजूतदारपणा कमी होऊ शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडणे होऊ शकतात.

किचन हे घराचं धान्याचं कोठार मानलं जातं आणि ते समृद्धीशी संबंधित आहे. वास्तुनुसार, जेव्हा ते बेडरूमच्या समोर असतं तेव्हा ते पैशाचा अपव्यय आणि उधळपट्टीला कारणीभूत ठरू शकतं. यामुळे घरात आर्थिक स्थिरतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.