
घराची निर्मिती करताना अनेकजण वास्तूशास्त्राचे नियम लक्षात गेतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच अनेकजण आपल्या बेडरुमचीही रचना करतात. वास्तूशास्त्रात बेडरुमच्या भिंतींना कोणता रंग असावा, बेड कुठे असावा याबाबत सविस्तर सांगितलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुम ही आपली खासगी खोली असते. त्यामुळेच बेडरुममधील प्रत्येक सामान हे विचारपूर्वकच ठेवायला हवे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमच्या भिंतीचा रंग हा गडत आणि भडक नसावा. हलका शेड असणारा रंग वापरल्यास बेडरुममध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमचा रंग हा हलका हिरवा, हलका निळा, फिकट गुलाबी, पांढरा असावा. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही. नात्यामध्ये गोडी निर्माण होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

बेडरुममध्ये दोन गाद्या एकमेकांना जोडलेल्या नसाव्यात. कधीही बेडवर एक अखंड गादी असावी. यामुळे नात्यात गोडी निर्माण होते. तसेच कलह आणि छोट्या मोठ्या गोष्टींमुळे भांडण होत नाही. बेडरुममध्ये भरपूर साऱ्या वस्तू नसाव्यात. अगदी मोजक्या आणि गरजेच्याच वस्तू बेडरुममध्ये असाव्यात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.