‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट; स्वानंदी-अधिराच्या चुडा विधीमध्ये अनपेक्षित प्रसंग

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचा महाविवाह सोहळा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Nov 02, 2025 | 9:25 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे.

2 / 5
मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत. स्वानंदीच्या चूडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बेंटेक्सच्या बांगड्या येतात. तिच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात.

3 / 5
सध्यातरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये. या घटनेमागे कोणाचा हात आहे,  हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा ठरणार आहे. दरम्यान, राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते. आधिराच्या चूडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदलतं.

4 / 5
आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे. या प्रसंगानंतर समरसमोर दोन्ही कुटुंबांमधील परिस्थिती शांत करण्याचं एक मोठ आव्हान उभं आहे. आता या घटनेमागील सत्य उलगडत असताना अनेक नाती परिक्षेत उतरतात.

5 / 5
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा आणि कौटुंबिक नात्यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उघड होणारं सत्य कोणते असेल आणि या घटनांनंतर नात्यांची वीण पुन्हा जुळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.