Shukra Asta 2026: पुढचे 14 दिवस धोक्याचे! या राशीच्या लोकांचे एक चुकीचे पाऊल पडेल महागात
आज, १४ ऑक्टोबर रोजी, शुक्र तूळ राशीत अस्त होईल. तो आज संध्याकाळी ५:३५ वाजता मावळेल. १४ दिवसांनंतर, २८ ऑक्टोबर रोजी तो पुन्हा उगवेल. हा काळ अनेक राशींसाठी तणाव आणि अडचणी घेऊन येईल.

शुक्र ग्रह प्रेम, सुख-सुविधा, विवाह आणि धन-दौलतीचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह अस्त झाल्याने तो अनेक राशींसाठी प्रतिकूल राहील. वैदिक ज्योतिषानुसार, त्याच्या प्रभावामुळे ४ राशींना हानी होऊ शकते. शुक्र ग्रहाचे अस्त होणे वृषभ, मिथुन आणि तुळ राशीसाठी शुभ ठरणार नाही. या राशींना आर्थिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागू शकतो. सुखाच्या कमी गोष्टी अनुभवता येतील आणि त्यामुळे तुमचा ताण वाढू शकतो.
मिथुन राशीच्या लोकांना शुक्र अस्त झाल्यामुळे करिअरबद्दल चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत काम करण्यात अडचणी येतील. तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
करिअरबद्दल मकर राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. खर्चांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नात घट होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत आणि निकालाबाबत चिंता वाटू शकते.
कामाच्या ताणामुळे तुळ राशीच्या लोकांना तणाव होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देईल. आत्मविश्वासात घट होईल आणि सुख-सुविधा प्रभावित होऊ शकतात. गुंतवणुकीबाबत अडचणी आणि नुकसान होऊ शकते.
वृषभ राशीच्या लोकांना शुक्रास्तमुळे आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो. आरोग्यात कमतरता आणि करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आनंदात घट होईल.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)