मुख्यमंत्र्याच्या मुलाशी केलं अरेंज मॅरेज, 11 दिवसातच झाली विधवा! नंतर बनली प्रसिद्ध अभिनेत्याची ४थी बायको
बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या 11 दिवसांनंतर तिच्या पतीचे निधन झाले. नंतर अभिनेत्रीने 20 वर्षांनी मोठ्या प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केले आणि त्याची चौथी बायको झाली.

बॉलिवूडचे कलाकार हे कामयच चर्चेत असतात. कधी त्यांचे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर कधी त्यांचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत तिने एकेकाळी बॉलिवूड अधिराज्य गाजवलं होतं. मात्र, तिचे खासगी आयुष्य इतके भयानक झाले होते की अनेकांना तिची दया येऊ लागली होती. मात्र, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिची साथ दिली.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे लीना चंदावडकर विषयी बोलत आहोत. दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्या नायिकेच्या रूपात त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला त्या सुनील दत्त यांच्या नायिकेच्या रूपात चित्रपटांमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत होत्या, पण परिस्थिती बदलल्यामुळे तो चित्रपट बंद झाला. लीना यांनी सुमारे २१ वर्षे चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही एकेकाळी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे.

लीना यांनी १८ वर्षांच्या वयात सुनील दत्त यांच्या दिग्दर्शनातील ‘मन का मीत’ या चित्रपटातून डेब्यू केले. हा चित्रपट हिट ठरला, ज्यानंतर त्यांचे नाव ७० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाले. चित्रपटांमध्ये यशस्वी करिअरनंतर त्यांनी २५ वर्षांच्या वयात सिद्धार्थ बांदेकर यांच्याशी लग्न केले. सिद्धार्थ हे एका मोठ्या राजकीय कुटुंबातील होते. त्यांचे वडील दयानंद बांदेकर हे गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री होते.

लीना आणि सिद्धार्थ यांचे लग्न अरेंज्ड होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच लीना यांच्या नशिबाने उलटे वळण घेतले. सिद्धार्थ बंदुकीची सफाई करत असताना गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लग्नाच्या 11 दिवसातच सिद्धार्थ यांचे निधन झाले.

लीना केवळ २५ वर्षांच्या वयात विधवा झाल्या. पतीच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी लीना यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला लीना यांच्या वडिलांनी या नात्याला संमती दिली नव्हती. कारण किशोर कुमार यांनी आधीच तीन विवाह केले होते आणि त्यांचे वय लीना यांच्यापेक्षा २० वर्षांनी जास्त होते आणि लीन हा त्यांची चौथी बायको होती. किशोर आणि लीना यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव सुमीत कुमार आहे.