VI ने लॉन्च केले 2 खास रिचार्ज प्लॅन, Airtel-Jio चे टेन्शन वाढले

VI Recharge Plan : वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे देशात 20 कोटी युजर्स आहेत. आता कंपनीने ग्राहकांसाठी 2 खास प्लॅन सादर केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 28, 2026 | 7:09 PM
1 / 5
VI (Vodafone Idea) ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी आहे. सध्या VI कडे देशभरात सुमारे 20 कोटी युजर्स आहेत. तुम्ही व्हीचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

VI (Vodafone Idea) ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी आहे. सध्या VI कडे देशभरात सुमारे 20 कोटी युजर्स आहेत. तुम्ही व्हीचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

2 / 5

वोडाफोन आयडियाच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, पण आता कंपनीने आणखी दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे.

3 / 5

कंपनीने 670 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यात 56 दिवसांची वैधता मिळते. तसेच सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते, दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात, तसेच अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो.

4 / 5

कंपनीने 1005 रुपयांचा आणखी एक प्लॅन सादर केला आहे. यात 84 दिवसांची वैधता मिळते, यातही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो.

5 / 5

या दोन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये वीआय ग्राहकांना OTT स्ट्रीमिंगसाठी अतिरिक्त OTT बेनिफिट्स देखील देत आहे. यामुळे जिओ आणि एअरटेल कंपन्यांची चिंता वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us