Vidya Balan: विद्या बालनचा एअरपोर्टवरच पतीसोबत रोमान्स; मिठी मारत केलं लिपलॉक, फोटो चर्चेत

Vidya Balan: आता विमानतळावरील त्यांच्या या रोमँटिक क्षणांमुळे विद्या आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाली असली तरी त्यांच्यातील प्रेमाची झलक पाहून चाहत्यांमध्येही या जोडीची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 28, 2026 | 9:03 AM
1 / 5
अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा एका खासगी क्षणामुळे चर्चेत आली आहे. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर दोघं एकत्र दिसले. यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यात त्यांचा एक खास क्षण कैद झाला.

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा एका खासगी क्षणामुळे चर्चेत आली आहे. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर दोघं एकत्र दिसले. यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यात त्यांचा एक खास क्षण कैद झाला.

2 / 5

दोघांनी एकमेकांना किस केल्याचं या फोटोंमध्ये दिसत असून, त्यांची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. विद्या बालन विमानतळावर पोहोचली असताना तिच्यासोबत पती सिद्धार्थ रॉय कपूरही दिसला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर किस करताना ते कॅमेऱ्यात कैद झाले.

3 / 5

या रोमँटिक क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. विद्या आणि सिद्धार्थ सामान्यतः त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांचा असा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाल्याने चाहत्यांचं विशेष लक्ष या फोटोंकडे गेलं आहे.

4 / 5

विद्या बालन आणि फिल्म प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 14 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांनंतरही दोघांमधील प्रेम आणि आपुलकी कायम असल्याचं त्यांच्या या व्हायरल फोटोंमधून दिसून येत आहे.

5 / 5

विद्या आणि सिद्धार्थ यांच्या नात्याची सुरुवातही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. ‘नो वन किल्ड जेसिका’च्या काळात दोघांची भेट झाली होती. त्यावेळी सिद्धार्थ यूटीव्ही मोशन पिक्चर्सशी संबंधित होता, तर विद्या या चित्रपटाचा भाग होती. पुढे एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्यातील जवळीक वाढली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us