Kingdom: राक्षसांचा राजा बनून थरकाप उडवणार विजय देवरकोंडा; ट्रेलरमधील हे 5 सीन्स चर्चेत

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या आगामी 'किंग्डम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तो एका गुप्तहेर एजंटची भूमिका साकारतोय.

| Updated on: Jul 27, 2025 | 1:24 PM
1 / 5
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु जेव्हा तो मोठ्या पडद्यावर येतो, तेव्हा तो त्याच्या ऊर्जेनं आणि आक्रमकतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतो. विजय देवरकोंडाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना त्याच्या आगामी 'किंग्डम' या चित्रपटाची मोठी प्रतीक्षा होती.

2 / 5
विजय देवरकोंडाच्या 'किंग्डम' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आधी दाक्षिणात्य भाषेत आणि त्यानंतर आता हिंदीत हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये विजयचा खूपच इंटेन्स लूक दिसत आहे. त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 / 5
या चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप फारसं काही उघड झालेलं नाहीत. त्यातील अॅक्शन सीन्स वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहेत. या ट्रेलरमध्ये विजयचे जबरदस्त अॅक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. कधी तो जमिनीवर, कधी पाण्यात तर कधी आकाशात साहसदृश्ये करताना दिसतोय.

4 / 5
या चित्रपटात विजयची भूमिका अत्यंत अनोखी आहे. त्याचे अनेक शत्रू आहेत. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागत आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
'किंग्डम'च्या ट्रेलरवर आणि विजयच्या भूमिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी करेल', असा विश्वास एका युजरने व्यक्त केला. चित्रपटातील विजयच्या नव्या लूकनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.