Vinod kambli : विनोद कांबळीची पेन्शनमध्ये गुजराण होते का? नेमके किती मिळतात पैसे
Vinod kambli pension : क्रिकेटच्या मैदानावर एकत्र नाव कमावणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्याबद्दल चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. पण काल कांबळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. कांबळीसाठी सध्या पेन्शन हाच एकमेव कमाईचा मार्ग असल्याची माहिती आहे.

काल विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तो प्रचंड चर्चेत आला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याची सगळेजण काळजी घेत आहेत, मला घरची आठवण येत नाही. पण या व्हिडिओमध्ये त्याला पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, कांबळीला किती पेन्शन मिळते याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी सध्या आजारपण आणि आर्थिक संकटांचा सामना करत असून, बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन हाच त्याच्या सध्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. उपलब्ध माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून माजी खेळाडूंना मिळणाऱ्या पेन्शन योजनेअंतर्गत विनोद कांबळीला दर महिन्याला ३०,००० रुपये दिले जातात.
सचिन तेंडुलकरला मिळते जास्त पेन्शन: कांबळीचा बालपणीचा मित्र आणि क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याला बीसीसीआयकडून दरमहा ५०,००० रुपये पेन्शन मिळते.
पेन्शनच्या रकमेत २० हजारांची तफावत: सचिन आणि विनोद कांबळी यांनी एकत्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही एकत्र नाव कमावले, तरीही दोघांना बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत तब्बल २० हजार रुपयांचा फरक आहे.
हलाखीची परिस्थिती असलेल्या आणि वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आलेल्या कांबळीसाठी बीसीसीआयकडून मिळणारी ही ३० हजारांची पेन्शन खूप मोठा आणि महत्त्वाचा आधार ठरत आहे.