ऐकावं ते नवलच ! चार पायांची कोंबडी कधी पाहिली का ? अनोखी कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे चार पायांची कोंबडी आढळल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. सिकंदर शेख यांच्या चिकन दुकानात ही दुर्मिळ कोंबडी दिसून आली. नागरिकांची ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. हा एक असामान्य प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

| Updated on: Nov 19, 2025 | 11:18 AM
1 / 5
जगात अनेक आश्चर्य ,वेगळ्या अतरंगी घटना घडत असतात. कधी कधी त्या पाहून आश्चर्य वाटतं तर कधी विस्मयाने तोंड उघडंच राहतात. असाच एक अतरंगी प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडला आहे. तेथील शिक्रापूर गावात चक्क 4 पायांची कोंबडी आढळून आली आहे. ही बातमी ऐकताच गावात एकच खळबळ माजली. आणि सर्वांनीच ती कोंबडी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली.

2 / 5
अशी अनोखी 4 पायांची कोंबडी दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून गावात जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी, थोड्क्यात सगळीकडेच या 4 पायांच्या कोंबडीची चर्चा सुरू आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यास, हे नेमकं कसं आणि कशामुळे हे समजून घेण्यास अनेक गावकरी उत्सुक आहेत.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात दररोज सकाळी बॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येत असतात. पण यावेळेस आलेल्या एका कोंबडीने फक्त दुकानदार शेख यांचंच नव्हे तर दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही खूप खास आहे.

4 / 5
शेख यांच्या दुकानात आलेली ही कोंबडी अशीतशी नव्हे तर खास आहे. कारण या कोंबडीला चक्क 4 पाय आहेत.  अशी कोंबडी आढळल्याने सर्वांनाच याचं आश्चर्य वाटलंय, ही चार पायाची कोंबडी पाहण्यासाठी नागरिकही शेख यांच्या दुकानात मोठी गर्दी करू लागले. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी चार पायाची कोंबडी पाहिली अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक सिकंदर शेख यांनी सांगितलं...

5 / 5
विशेष म्हणजे या कोंबडीची पूर्ण वाढ झाली असून चारही पाय हे वेगवेगळे असून चारही पायांना स्वतंत्र अशा नख्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  एका जनुकीय बदलामुळे हा प्रकार घडतो,  पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती असल्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले आहे. मी माझ्या नोकरीच्या संपूर्ण कारकिर्दीत आणि आयुष्यात पहिल्यांदात अशी 4 पाय असलेली कोंबडी पाहिल्याचेही ते म्हणाले.