
1 मे रोजी अनुष्का शर्माने आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थ डे पार्टीमध्ये अनेक खास व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

अनुष्का शर्माच्या बर्थ डे पार्टीमध्ये चित्रपट सृष्टीपेक्षा क्रिकेट विश्वातून जास्त लोक उपस्थित होते.

विराट कोहली IPL मध्ये RCB टीमकडून खेळतो. या RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसी अनुष्काच्या बर्थ डे पार्टीला हजर होता.

डु प्लेसी शिवाय विराटसोबत RCB टीममधून खेळणारे ग्लेन मॅक्सवेल सुद्धा पत्नी विनी रमनसोबत या बर्थ डे पार्टीला हजर होता.

स्पेशल शेफने अनुष्काच्या बर्थ डे साठी जेवण बनवलं होतं. मनु चंद्राने अनुष्काच्या बर्थ डे साठी स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. विराट कोहलीने मनु चंद्राचे आभार मानले.