Virat Kohli Eknath Shinde Meeting : विराट कोहली लंडनमध्ये भेटला तेव्हा त्याने काय सांगितलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Virat Kohli Eknath Shinde : लंडनमध्ये विराट कोहली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदें यांची भेट झाली आहे. दरम्यान, या भेटीत दोन्ही दिग्गजांमध्ये काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली आहे. खुद्द शिंदेंनीच याचा खुलासा केला आहे.

| Updated on: Sep 11, 2026 | 8:05 PM
1 / 5
लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनौपचारिक भेट झाली.

लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनौपचारिक भेट झाली.

2 / 5

एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर असून, या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आणि त्यांचा गौरवही करण्यात आला.

3 / 5

दुसरीकडे विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अशातच क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील या दोन प्रमुख व्यक्तींची परदेशात झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

4 / 5

ही भेट अचानक झाली की पूर्वनियोजित होती, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, भेटीचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

5 / 5

एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "विराटशी यापूर्वीही भेट झाली आहे. पण आज आमच्यात थेट संभाषण झालं आणि याने मला खूप आनंद झाला. मला मिळालेल्या पुरस्कारांवरही चर्चा झाली. मी त्याला महाराष्ट्राच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल सांगितले. मी पायाभूत सुविधांबद्दल बोललो आणि विराट म्हणाला की, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जो विकास झाला आहे तो अभूतपूर्व आहे."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us