
यवतमाळमध्ये रस्त्यावर असलेल्या झाडांना तोडण्या मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे. पण त्या मागणीची अद्याप कोणी दखल घेतलेली नाही.

दखल कोणी घेत नसल्याने उपसरपंचांनी झाडावर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावेळी त्या झाडाच्या खाली परिसरातले अनेक लोक जमल्याचे दिसत आहे.

यवतमाळ दारव्हा मार्गावरील तिवसा गावाजवळ रस्त्यावर 4 ते 5 मोठे वृक्ष आहेत. अनेकदा तिथं अपघात झाले आहेत. अनेक लोकांनी झाडांची तोडणी करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही.

या वृक्षाला धडकून माजी सभापती याचा अपघाती मृत्यू झाला होता.अपघाताला कारणीभूत झाडे तोडण्याच्या मागणी साठी उपसरपंच सतीश शेटे याचे झाडावर चढून आंदोलन केले आहे.