जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहूनच….

ना गर्दी, ना जास्त खर्च, महाराष्ट्रात पावसाळा सुरु होताच या हिरवाईने नटलेल्या आणि शांत वातावरण आणि समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक करतात मोठ्या प्रमाणात गर्दी. कुठे आहे हे ठिकाण?

| Updated on: Jul 02, 2026 | 2:05 PM
1 / 5
पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

2 / 5
विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.

3 / 5
येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून, समुद्राच्या लाटांचा आनंद, रम्य किनारा आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो.

4 / 5
याशिवाय रत्नागिरीजवळील तीर्थ गंगा हे शांत आणि पवित्र ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानले जाते. नदीकाठचे निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

5 / 5
इतिहासप्रेमींसाठी विजयदुर्ग किल्ला हा खास आकर्षणाचा विषय आहे. समुद्रकिनारी उभारलेला हा भव्य किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. येथून दिसणारे अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

Follow Us