AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT कंपनीच्या पाळणाघरात धक्कादायक प्रकार; लहानग्यांवर अत्याचार; रडणाऱ्या मुलांना वॉशिंग मशीनमध्ये घातलं अन्…Video Viral

बंगळूरमधील एका पाळणाघरात दोन वर्षांच्या लहान मुलांवर होणाऱ्या क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे अमानवीय वागणुकीचे आरोप समोर आले आहेत.

IT कंपनीच्या पाळणाघरात धक्कादायक प्रकार; लहानग्यांवर अत्याचार; रडणाऱ्या मुलांना वॉशिंग मशीनमध्ये घातलं अन्...Video Viral
bengaluru daycare child abuse
| Updated on: Jul 02, 2026 | 2:57 PM
Share

कर्नाटकची राजधानी बंगळूरुमध्ये एका आयटी कंपनीच्या डे केअर सेंटरमध्ये एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. येथे, एका मोलकरणीने दोन वर्षांपर्यंतच्या निष्पाप मुलांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलांना मारहाण करणे, धमकावणे आणि अमानुष वागणूक दिल्याचे आरोप आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी पाच मोलकरणींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना बंगळूरुच्या एचएएल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रुकफील्ड भागातील एका मोठ्या आयटी कंपनीच्या आवारातील डे केअर सेंटरमध्ये घडली. कर्मचारी कामावर जाताना आपली लहान मुले तिथे सांभाळायला ठेवतात. मुलांची काळजी घेण्याऐवजी, मोलकरणींनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला, असा आरोप आहे.

मुले रडल्यावर किंवा गैरवर्तन केल्यावर मोलकरणी त्यांच्याशी क्रूरपणे वागत असल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये एका मुलाला वॉशिंग मशीनमध्ये टाकल्याचेही दिसत असल्याचा आरोप आहे. याव्यतिरिक्त, शौचालयाच्या जेट स्प्रे पाईपमधून मुलांच्या तोंडात जबरदस्तीने पाणी ओतण्यासारखी अमानवीय कृत्ये कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, मुलांना शौचालयात कोंडून धमकावून गप्प राहण्यास भाग पाडले जात असल्याचाही आरोप आहे. या व्हिडिओमध्ये निष्पाप मुलांचे भीतीने रडणे आणि किंचाळणे देखील ऐकू येते. हे व्हिडिओ समोर आल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला असून, त्यांच्या मुलांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाच लोकाविरुद्ध एफआयआर दाखल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, चाइल्ड हेल्पलाइनला एक तक्रार मिळाली. तक्रारीच्या आधारे, एचएएल पोलीस ठाण्याने तात्काळ तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर, डेकेअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या पाच लोकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी केली जात आहे आणि सर्व बाबी विचारात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू आहे. जर हे आरोप खरे असल्याचे आढळले, तर आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार