Pune child rape murder : मुलीच्या किंचाळ्या, शरीरावर 18 जखमा, आई – वडिलांच्या वेदना अन्…., न्यायाधीश काय म्हणाले? प्रत्येकाच्या डोळ्यात होतं पाणी…

Pune child rape murder : चिमुकल्या मुलीच्या त्या किंचाळ्या... तिची निरागसता... शरीरावरील 18 जखमा... आई - वडिलांच्या वेदना अन्...., नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा तर मिळाली, पण शिक्षा सुनावताना न्यायाधीश जे काही म्हणाले, ते जाणून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल...

Pune child rape murder : मुलीच्या किंचाळ्या, शरीरावर 18 जखमा, आई - वडिलांच्या वेदना अन्...., न्यायाधीश काय म्हणाले? प्रत्येकाच्या डोळ्यात होतं पाणी...
| Updated on: Jul 01, 2026 | 10:44 AM

Pune child rape murder : नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा तर झालीच, पण त्या निरागस मुलीची काय चूक होती? हा एकच प्रश्न अनेकांना पडलाच. अंतिम सुनावणीच्या वेळी कोर्टात त्या चिमुकलीच्या आई – वडिलांसमोर तो 65 वर्षांचा नराधम उभा होता… तेव्हा त्या आई – वडिलांना काय वेदना झाल्या असतील. याचा कोणी अंदाज देखील बांधू शकत नाही. स्पेशल फास्ट – ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश आर. एस. साळुंखे यांनी त्या नराधमाला फाशी तर सुनावली, पण त्याठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती खचलेली होती. भीमराव कांबळे याने केलेल्या कृत्याला रेयरेस्ट ऑफ द रेयर केस म्हणण्यात आलं… रिपोर्टनुसार, आर. एस. साळुंखे शिक्षा सुनावण्याआधी चिमुकलीबद्दल म्हणाले, तिला फक्त एक वासरु पाहायचं होतं, त्यामुळे ती देखील आनंदात गेली.

आर. एस. साळुंखे म्हणाले, ‘कोर्टाला फक्त तथ्यांवर विचार करायचा नसतो तर, जे घडलं आहे, ते आपल्या इंद्रियांनी अनुभवायचं देखील असतं… मुलीच्या त्या किंचाळ्या ऐकण्यासाठी स्वतःची विचारशक्ती सतर्क ठेवावी लागेल. त्या किंचाळ्या एवढ्या तिव्र होत्या की, ऑडीओ – व्हिडीओ आणि CCTV कॅमेऱ्यात देखील कैद झाल्या. नराधमाने मुलीला पोहोचवलेल्या 18 जखमांना कोर्ट अनुभवेल… कोर्ट आपल्या विचारशक्तीने CCTV फुटेज अनुभवेल…’

‘CCTV फुटेज, ज्यामध्ये निरागस मुलगी आरोपीवर विश्वास ठेवते आणि आपल्या छोट्या छोट्या पावलांनी त्याच्यासोबत चालते. मुलीला फक्त वासरु पाहायचं होतं, त्या वासरूला पाहण्यासाठी ती उत्सुक होती. पण तिला काय माहिती होतं, यासाठी तिला इतकी मोठी किंमत मोजावी लागणार आहे… तिला स्वतःचे प्राण गमवावे लागतील… हा तिच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास होता, याची तर तिला कल्पनात नव्हती… आपल्या लाडक्या मुलीसाठी न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायालयाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पीडितेच्या पालकांच्या भावना न्यायालय स्वतः अनुभवेल.’

‘मृत मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या जखमांवरून तिच्यावर करण्यात आलेल्या अमानवीय अत्याचाराची बाब स्पष्ट होते. आरोपीने कोणत्याही भीतीशिवाय आणि अत्यंत क्रूरतेने वागत, परिणामांची तमा न बाळगता त्या मुलीवर स्वतःच्या मनाप्रमाणे अत्याचार केले. कदाचित याचं कारण असं असावं की, आपल्यावर खटला चालवला गेला तरी न्यायालयात त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असंच त्याला वाटत होतं. ‘

सांगायचं झालं तर, आरोपीचं यापूर्वी देखील क्रिमिनल रेकॉर्ड आहे. प्रकरणानंतर लोकांमध्ये उसळलेल्या संतापाच्या लाटेबद्दल देखील कोर्टाने म्हटलं की, पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून लोकं रस्त्यावर उतरली, आरोपीला जनतेच्या ताब्यात द्या… अशी त्यांची मागणी होती. कारण त्यांना स्वतःच आरोपीला शिक्षा द्यायची होती. त्यांचा कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांवर विश्वास नव्हता. लोकांमध्ये अशी मानसिकता का निर्माण होते, याचा विचार करणं गरजेचं आहे. अंतिम निर्णय सुनावताना न्यायाधीश म्हणाले, ‘या न्यायालयाच्या न्यायिक सद्सविवेकबुद्धीचा असा ठाम निष्कर्ष आहे की, आरोपीसाठी फाशीची शिक्षा हीच एकमेव योग्य शिक्षा आहे.’, अखेर 60 दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us