AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप

Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं… तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप

| Updated on: Jul 01, 2026 | 12:12 PM
Share

राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.

राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, पक्षाची उभारणी ही शिवसैनिकांच्या मेहनतीवर होत असते. सचिन अहिर यांना पक्षाने आणि ठाकरे कुटुंबाने भरभरून संधी दिली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला बळ दिले, भारतीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तसेच पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. एवढे मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळूनही त्यांनी पक्ष सोडल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना राऊत यांनी, सर्व काही मिळाल्यानंतरही पक्ष सोडणे हे विश्वासाला तडा देणारे असल्याचे सांगितले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वळणे आणि वाद राहिल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत, पक्षफोडीनंतर आनंद व्यक्त केला जात असल्याची टीका केली. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी पाच जण मूळचे काँग्रेसचे असल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

Published on: Jul 01, 2026 12:12 PM

Follow Us
आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?.

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?.

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?

दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट.

दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या...

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..