AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....

सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट….

| Updated on: Jul 01, 2026 | 12:18 PM
Share

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे महायुतीकडून सचिन अहिर यांना मोठे महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवार देण्यात आला असला तरी सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अचानक झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.अलीकडेच बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या ज्याप्रमाणे सुरक्षा दिली जात होती त्याप्रमाणेच अहिर यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Published on: Jul 01, 2026 12:18 PM

Follow Us
CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!.

CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो.

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं.

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं