
शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पनवेलमध्ये रामदास उर्फ वाघ्य मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह दहा जणांना अटक केली आहे.

विठ्ठल शेलार हासुद्धा मोठा गुंडच आहे. मुळशीमधील बोतरवाडीचा आहे. शेलार सुरूवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता. विठ्ठल शेलारने पिंट्या मारणेला संपवत आपली गँँग प्रस्थापित केली. याआधी मोहोळ आणि शेलार गँगमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या वादातूनच हत्या झाल्याची माहिती समजत आहे.

विठ्ठल शेलार याच्यावर 2014 साली मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. जेलमधून तो जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर 2017 साली भाजप आमदार गिरीष बापट यांच्या उपस्थितीमध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, गिरीष बापट यांनी त्यानंतर माफीसुद्धा मागितली होती. कारण एका कुख्यात गुंडाला पक्षामध्ये घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. शरद मोहोळ याच्या हत्येमागे त्याचाच हात असल्याची आता दाट शक्यता आहे.