AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होताच दोन तासांमध्ये पहिला मोठा धक्का, एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक

मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र दुसरीकडे युतीची घोषणा होऊन दोन तास उलटत नाहीत तोच मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होताच दोन तासांमध्ये पहिला मोठा धक्का, एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक
मनसेला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 4:27 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तर मराठी आणसानं आमच्या पाठिशी उभं राहावं  असं भावनिक आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  दरम्यान एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युतीची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे युतीची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच मनसेला मोठा धक्का बसला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुमित खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणूक आहे, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे, मात्र त्यातच आता मनसेला या निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून अनेकांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. यामधून आता मनसे देखील सुटू शकलेली नाहीये. शिवसेना शिंदे गटानं मनसेला धक्का दिला आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आवाहन आता शिवसेना ठाकरे गटासममोर असणार आहे. तर मनसेमध्ये देखील अनेक नेते नाराज आहे, आता पक्ष या नाराज नेत्यांची समजूत कशी घालणार? नाराजी कशी दूर होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसीकडे तब्बल 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंदू एकत्र आल्यानं राज्यात आनंद आणि उत्साहाच वातावरण आहे.

नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.