
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकतेच दोन स्मार्टफोन रिलीज केले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro असं या फोनचं नाव आहे. या स्मार्ट फोन्समध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत.

Vivo X90 Pro 12 GB RAM, 1256 GB स्टोरेजची किंमत रु. 84,999 आहे. तर Vivo X90 8GB RAM, 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 59,999 आहे. तसेच 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत रु. 63,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच AMOLED डिस्प्ले आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन 1,260x 2,800 पिक्सेल आहे.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर हे फोन चालतात. हे फोन ऑक्टा-कोर 4nm MediaTek डायमेंशन 9200 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी 4870 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेर्याचं सांगायचं तर 50+50+12 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.