वेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल?

| Updated on: Jan 23, 2022 | 4:25 PM

वेगाने चालल्याने हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी कमी होतो. असा दावा अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या एका संशोधनात केला आहे. जाणून घेऊयात नुसत्या वेगात चालल्यामुळे तुम्ही हृदयविकाराच्या धक्क्यापासून कसे दूर राहू शकता.

1 / 5
वेगाने चालल्याने  हृदयविकाराचा धोका हा  34 टक्क्यांनी कमी होतो. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. दोन दशकांपासून महिलांवर केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे. वृद्धापकाळात हृदयविकाराची शक्यता अधिक असते. मात्र तुम्ही नुसते नियमित चाललात तरी देखील तुम्ही या सारख्या आजारांना दूर ठेवू शकता. असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

2 / 5
संशोधन कसे झाले ते प्रथम जाणून घेऊयात. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तब्बल 25,000 पेक्षा जास्त वृद्ध महिलांवर दोन दशके संशोधन केले. या काळात 1,455 महिलांना हार्ट फेल्युअर झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच  हृदययाशी संबंधित इतर आजार देखील या महिलांना झाले.

3 / 5
अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, संशोधनात सहभागी महिलांना त्या किती चालतात याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच दोन दशके संबंधीत महिलांच्या चालण्याचा सवयीचा अभ्यास करण्यात आला. या माध्यमातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या महिला वेगाने चालतात त्यांच्या मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण कमी आहे.

4 / 5
याबाबत बोलताना संशोधक डॉ. चार्ल्स इटॉन यांनी सांगीतले की, आम्ही  25,000 पेक्षा जास्त वृद्ध महिलांच्या चालण्याच्या सवयींचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आम्हाला असे आढळून आले की, ज्या महिलांना जलद चालण्याची सवय आहे, त्या महिलांमध्ये  हृदयाशी सबंधित समस्या कमी आहेत. तसेच वाढत्या वयामध्ये हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर लाईफस्टाईलमध्ये देखील काही बदल करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

5 / 5
या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जे व्यक्ती हळूहळू चालतात. त्यांच्यामध्ये प्रामुख्य स्थूलपणाचे लक्षणं आढळतात. त्यामुळे ते हृदयविकाराला आमंत्रण ठरू शकते. शक्यतो चालताना थोडे वेगाने चालावे. यामुळे तुम्ही हृदयविकाराच्या समस्येपासून दूर राहू शकता. संबंधित माहिती ही सामान्य ज्ञान तसेच प्राप्त अहवालावर आधारीत आहे. मात्र कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही एकदा तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.