
‘वॉर 2’मध्ये अभिनेते आशुतोष राणा यांनी कर्नल सुनील लुथराची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना 80 लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अनिल कपूरसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांना 10 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

‘वॉर 2’मध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी ही कर्नल सुनील लुथरा यांची मुलगी काव्या लुथराची भूमिका साकारणार आहे. यासाठी तिला तगडी फी मिळाली आहे. कियाराचं मानधन 15 कोटी रुपये असल्याचं समजतंय.

‘ब्रह्मास्त्र’ फेम दिग्दर्शक अयान मुखर्जीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटासाठी त्याला तब्बल 32 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अयान हा अभिनेत्री राणी मुखर्जीचा चुलत भाऊ आहे.

मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशनला ‘वॉर 2’मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी हृतिकने तब्बल 50 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं कळतंय.

‘वॉर 2’ या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी त्याला सर्वाधिक फी मिळाल्याचं कळतंय. ज्युनियर एनटीआरने तब्बल 70 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.