‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी; पाचव्या दिवशी ‘राजा शिवाजी’सह 8 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

अभिनेता अक्षय कुमार आणि इतर 30 मोठमोठ्या कलाकारांची भूमिका असलेल्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आठ चित्रपटांना मागे टाकलं आहे.

| Updated on: Jul 01, 2026 | 1:46 PM
1 / 5
'वेलकम टू द जंगल' हा कॉमेडी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत 77 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या वेगाने या चित्रपटाची कमाई होत आहे, त्यानुसार हा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणार असल्याचं दिसतंय.

2 / 5
सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी रात्री 10.30 वाजेपर्यंत या चित्रपटाने 9.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'वेलकम टू द जंगल'च्या नेट कलेक्शनचा आकडा 81 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अहमद खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

3 / 5
या चित्रपटाचे पेड प्रीव्हूजसुद्धा होते. त्यातून 3.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.25 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 24.75 कोटी रुपये कमावले होते. चौथ्या दिवसाची कमाई 8.5 कोटी रुपये इतकी झाली होती.

4 / 5
जगभरात या चित्रपटाने 106.48 कोटी रुपये कमावले आहेत. तर ओव्हरसीज मार्केटमध्ये 19.95 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं आहे. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने पाचव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आठ चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी 3.35 कोटी रुपये कमावले होते.

5 / 5
शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'ने पाचव्या दिवशी 5.35 कोटी रुपये, 'इक्कीस'ने 1.35 कोटी रुपये, 'मैं वापस आऊंगा'ने 1.65 कोटी रुपये, 'हाँटेड थ्रीडी'ने पाचव्या दिवशी 2 कोटी रुपये, 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाने 3.85 कोटी रुपये, 'पेद्दी'च्या हिंदी व्हर्जनने 1.5 कोटी रुपये आणि 'पती, पत्नी और वो दो' या चित्रपटाने 3.5 कोटी रुपये कमावले होते.

Follow Us