Beer And Bar : बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर कधीच करू नका ही चूक, बाजूचे लोक थेट भांडायलाच उठतील!
बारमध्ये मद्य प्यायला बसल्यानंतर तुमच्याकडे ड्रिंक सर्व्हर येतो. तुम्हाला कोणते मद्य हवे आहे, याची त्याच्याकडून विचारपूस केली जाते. अशा वेळी काही लोक ड्रिंक सर्व्हरला शिवीगाळ करतात.

मद्य आरोग्यास हानिकारक असते. परंतु आजही लाखो लोक रोज मद्यपान करतात. पार्टी, क्लब, बारमध्ये आजही हजारो लोक बारमध्ये जाऊन मद्यप्राशन करतात. बारमध्ये कित्येक तास बसून दारू पिणारेही आहेत.
दरम्यान, बारमध्ये एकदा गेल्यानंतर काही लोक असेच बसून राहतात. त्यांच्यामुळे इतर लोकांनाही त्रास होतो. त्यामुळे बारमध्ये मद्यप्राशन करताना काय काळजी घ्यावी? कोणते नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊ.
बारमध्ये मद्य प्यायला बसल्यानंतर तुमच्याकडे ड्रिंक सर्व्हर येतो. तुम्हाला कोणते मद्य हवे आहे, याची त्याच्याकडून विचारपूस केली जाते. अशा वेळी काही लोक ड्रिंक सर्व्हरला शिवीगाळ करतात. परंतु अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे. ड्रिंक सर्व्हरशी नेहमी प्रेमाने बोलावे.
जेव्हा तुम्ही बारमध्ये मद्य पिण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला नेमकं काय हवं, याची लगेच ऑर्डर द्या. उगीचच समोरच्या व्यक्तीचा वेळ घेऊ नका. तुम्हाला काय घ्यायचे आहे, हे तुम्हाला माहिती असायला हवे. एकदा ऑर्डर दिल्यानंतर पुन्हा पुन्हा ड्रिंक सर्व्हरला त्रास देऊ नका. एकाच वेळी तुमच्या ड्रिंकची ऑर्डर द्या. सोबतच तुमच्या बाजूच्या व्यक्तीला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. नेहमी हळू आवाजात बोला.
(टीप - मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्यापान केल्याने यकृत खराब होते. वरील लेखातील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही.)