
आजकाल काही लोक आवडीने मद्यप्रशान करतात. काही लोकांसाठी तर मद्यप्राशन हे प्रतिष्ठेचे साधन बनले आहे. आरोग्यास हानिकारक असले तरीही लोक मद्यपान करतात. बहुसंख्य लोकांना बिअर प्यायला आवडते. काही मद्यांची चव ही खूपच कडू असते.

परंतु काही बिअर या चवीला गोड लागतात. म्हणूनच लोक गोड चव असलेली बिअर पिणे पसंद करतात. भारतात आवडीने पिले जाणारे बिअरचे काही खास ब्रँड आहेत. या ब्रँडची नावे काय आहेत, ते जाणून घेऊ या..

मिलर ही एक अमेरिकन बिअर आहे. ती पिण्यासाठी लाईट आणि स्मूथ असते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात या बिअरला वेगळी ओळक आहे. कॉर्न सिरपमुळे मिलर ही बिअर चवीला गोड लागते. सिंबा हा बिअरचा इंडियन ब्रँड आहे. ही बिअरसुद्धा चवीला गोड लागते.

फॉस्टर हा बिअरचा ब्रँड ऑस्ट्रेलियाचा आहे. भारतात ही बिअरदेखील आवडीने पिली जाते. जगभरात ही बिअर प्रसिद्ध आहे. ही बिअर एक्स्ट्रा कोल्ड करून प्यायला दिली जाते. ही बिअरदेखील चवीला गोड असते. कोरोना लाईट ही मेक्सिकन बिअर आहे. हा ब्रँडदेखील लोक आवडीने खरेदी करतात. ही बिअरही चवीला गोड असते.

(टीप- मद्यप्रशान हे आरोग्यास हानिकारक आहे. मद्यप्राशन करू नये. मद्य पिण्याची सवय लागली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यावी. )