Plane Emergency Code : विमानात इमर्जन्सी कोड कोणकोणते असतात? तिसरा कोड आला की सगळेच घाबरतात!
विमानात काही तात्रिक बिघाड झाली किंवा अन्य काही समस्य उद्भवल्यास लगेच इमर्जन्सी सिग्नल देऊन मदत मागितली जाते. अनेकदा विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले जाते. परंतु विमानात कोणती अडचण आहे हे खाली विमानांचे ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्यांना कसे समजते? असा प्रश्न विचारला जातो.

विमानातून प्रवास करायला प्रत्येकालाच आवडतं. परंतु आजकाल विमान अपघतांच्या प्रमाणात खूपच वाढ झाली आहे. विमानातील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी नियमांचे कठोर पालन केले जाते.
विमानात काही तात्रिक बिघाड झाली किंवा अन्य काही समस्य उद्भवल्यास लगेच इमर्जन्सी सिग्नल देऊन मदत मागितली जाते. अनेकदा विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले जाते. परंतु विमानात कोणती अडचण आहे हे खाली विमानांचे ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्यांना कसे समजते? असा प्रश्न विचारला जातो.
कोड 7600 हा विमानाची रेडिओ सिस्टीम खराब झाल्यावर पाठवला जातो. अशी स्थिती उद्भवल्यास पायलट लगेच 7600 स्क्वॉक कोड पाठवून देतो. हा कोड मिळताच विमान सुरक्षित आहे परंतु वैमानिक आमचे बोलणे ऐकू शकत नाहीये अशी माहिती ट्रॅफिक कंट्रोलला मिळते.
कोड 7700 हा वैद्यकीय स्वरुपाची आणीबाणी आल्यास पाठवला जातो. विमानात आग लागली किंवा एखाद्या प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली की अशा प्रकारचा कोड पाठवला जातो. हा कोड मिळताच वैद्यकीय मदत तयार ठेवली जाते.
विमानातील या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी काही कोड असतात. हे इमर्जन्सी कोड अडचणीच्या काळाताच पाठवले जातात. यातील सर्वात महत्त्वाचा 7500 स्क्वॉक कोड आहे. विमान हायजॅक झालेल असेल किंवा खूपच कठीण काळ असेल तर हा कोड पाटवून मदत मागितली जाते.