
आजकाल स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढले आहे. स्ट्रोक येण्याआधी शरीराला कोणतेही संकेत मिळत नाहीत, असा लोकांचा समज आहे. पण स्ट्रोक येण्याआधी शरीर काही संकेत देते. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. शरीर खाली दिलेली लक्षणं देत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

तुम्हाला वारंवार मळमळ होत असेल तसेच चक्कर येत असेल तर तुमच्या रक्ताभीसरणाची प्रक्रिया सुरळीत नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे सतत उलटी होत असेल चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

फारच परीश्रम घेतले तर थकवा येऊ शकतो किंवा कधीकधी डोकेदुखीचाही त्रास जाणवतो. मात्र हा त्रास सतत होत असेल तर हे तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे हे संकेत असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पाय, हात किंवा एका बाजूने शरीरा सुन्न होत असेल तर तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करत नाही, असे संकेत असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला दिसण्यात अचानकपणे अडचण येत असेल किंवा अचानकपणे अंधूक दिसत असेल तर सेरेब्रल आर्टेरीमध्ये कमी दाब निर्माण झाल्याची शक्यता असू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)