मनुके भिजवून खाण्याचे आहेत असंख्य फायदे, वाचा!

| Updated on: Sep 22, 2023 | 5:11 PM

मनुके भिजवून खावेत की तसेच खावेत? कधी खावेत? काय फायदा होतो त्याने? मनुक्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. रक्त वाढवण्यापासून ते कॅल्शियम अशा अनेक गोष्टींसाठी भिजवलेले मनुके फायदेशीर असतात. जाणून घ्या...

1 / 5
ड्राय फ्रुट्स रात्रभर भिजवत ठेवावेत आणि सकाळी उठून खावेत असा सल्ला नेहमी दिला जातो. मनुके भिजवून खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपला बऱ्याच रोगांपासून बचाव होतो. सकाळी उपाशी पोटी सर्वात आधी मनुके खावेत.

2 / 5
आपली आजी आजोबा सुद्धा बसल्या बसल्या मनुके, काजू, बदाम खायचे. आपल्याला लहान असताना सुद्धा हे दिले जातात. मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जीवनसत्त्वे असतात, खनिजे असतात. या सगळ्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते.

3 / 5
शरीरात रक्त कमी होतं, आपल्याला त्यावेळी मनुके खायचा सल्ला दिला जातो. मनुक्यामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असते. भिजवलेल्या मनुक्यांनी रक्ताची कमतरता दूर होते, हिमोग्लोबिन वाढते.

4 / 5
भिजवलेले मनुके खायचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मनुक्यांमध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियमने शरीराची हाडे मजबूत होतात. तिशीनंतर तर शरीरातील हाडे कमजोर होत असतात. कॅल्शियम साठी रोज भिजवलेले मनुके खावेत.

5 / 5
ज्या लोकांना गॅस, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ असा त्रास होतो त्यांनी भिजवलेले मनुके खावेत. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते. मनुके भिजवून खाल्ल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.