
धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांची दिनचर्या बदलली आहे. कामाचा वाढता ताण, उशीरापर्यंत जागण्याची सवय, आणि खराब लाईफस्टाईलमुळे अनेक लोक रात्री उशीरा जेवतात. रात्री उशीरा घरी येणे, उशीरापर्यंत मोबाईल वा टीव्ही पाहणे, नंतर शेवटी उशीरा जेवणे, यामुळे तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होत असतो.

तज्ज्ञांच्या मते तुमच्या शरीराचे एक नैसर्गिक घड्याळ असते. जी पचन, झोप आणि एनर्जीच्या स्तराला प्रभावित करते. जेवणाची वेळ वारंवार बदलणे,रात्री उशीरा जेवणे, यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम पडू शकतो. रात्री उशीरा जेवल्याने त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.

दिल्ली एमसीडीचे डॉ.अजय कुमार यांनी सांगितले की रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य समस्यांची जोखीम वाढते.झोपण्याआधी जेवल्याने जेवण पचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे पचन समस्येतील एसिडीटी, गॅस, अपचन होऊ शकते. दीर्घकाळ या सवयीने वजन वाढणे आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

लठ्ठपणामुळे पुढे हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सारख्या आजाराची जोखीम वाढते. रात्री उशीरा तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरात कॅलरी जास्त जमते. कारण रात्री शरीराची एनर्जी खर्च करण्याची क्षमता कमी होते. तसेच या सवयीने झोपेची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे हॉर्मोन संतुलनवर परिणाम होऊ शकते. त्यामुळे हळूहळू अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्री उशीरा जेवल्याने एसिडीटी, छातीत जळजळ, पोट जड होणे आणि गॅसची समस्या होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतरही आळस येणे, थकवा आणि भूक कमी होण्याच्या तक्रारी येऊ शकतात.

उशीरा जेवल्याने झोपेत व्यत्यय येतो. झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे पचनाच्या देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.रात्री झोपण्याआधी किमान दोन ते तीन तास आधी जेवण करावे.जेवण हलके आणि संतुलित असावे. त्यामुळे सहज पचन होते.

रात्री तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. रात्री नियमित वेळी झोपणे आणि सकाळी नियमित वेळी उठण्याची सवय लावून घ्यावी.

जर वारंवार अपचन होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम असते. योग्य आहार आणि नियमित दिनचर्या यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारीपासून वाचता येते.