
ब्युटी आणि मेकअप टिप्स : प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं. त्यामुळे मुली नवीन सौंदर्य उत्पादने आणि त्यांची माहिती. मेकअपचे ट्यूटोरियल व्हिडिओ आणि लेटेस्ट ब्युटी ट्रेंड्स, त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय सर्च करत असतात.

ऑनलाईन शॉपिंग : मुलींना शॉपिंगची खूप आवड असते. त्यामुळे त्या विविध शॉपिंग वेबसाइट्सवर नवीन कलेक्शन पाहतात. कपडे, ॲक्सेसरीज, आणि इलेक्ट्रॉनिक्सवरील ऑफर्स, आवश्यक वस्तूंची किंमत आणि रिव्ह्यू पाहून शॉपिंग करतात.

गाणी ऐकणे आणि चित्रपट : दिवसभराचा ताण कमी तरूणी करण्यासाठी हलकी-फुलकी रोमँटिक गाणी किंवा शांत संगीत ऐकतात. तसेच नवीन चित्रपट, वेब सिरीज किंवा टीव्ही शोबद्दल माहिती घेतात.

करिअर आणि अभ्यास : अनेक मुली सध्याच्या करिअरमधील पुढील संधी शोधतात. तसेच नवीन कौशल्ये शिकण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस किंवा उच्च शिक्षणाच्या पर्यायांबद्दल माहिती घेतात.

हेल्थ आणि फिटनेस : अनेक मुली डाएट प्लॅन, वजन कमी करण्याचे सोपे उपाय. विविध प्रकारचे व्यायाम आणि योग कसे करावे, याचे व्हिडिओ पाहतात.