
जगभरात सापांच्या सुमारे 400 प्रजाती आढळतात. त्यातील 600 प्रजाची विषारी आहेत. तसेच भारतात आढळणाऱ्या 300 प्रजातींपैकी 60 प्रजाती विषारी आहेत. यातील 4 प्रजाती प्राणघातक आहेत.

जर 2 विषारी साप चुकून एकमेकांना चावले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? याचे उत्तर अनेकांना माहिती नाही. मात्र नक्कीच काहीतरी भयानक असेल.

अनेकदा असे होते की दोन साप चुकून किंवा जाणूनबुजून एकमेकांना चावतात. मारमारी दरम्यान किंवा अन्नासाठी दोन साप एकमेकांना चावतात.

जर दोन्ही साप एकाच प्रजातीचे असतील तर दोन्ही साप जगू शकतात. कारण एकाच प्रजातीच्या सापांमध्ये एकाच विषासाठी अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतात.

जर वेगवेगळ्या प्रजातींचे साप एकमेकांना चावले तर जास्त विषारी सापाचे विष कमी विषारी सापासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कमी विषारी सापाचा मृत्यू होऊ शकतो.