पाणी जास्त प्यायल्यावर काय होतं? वाचा आरोग्यावर होणारे परिणाम

पाणी जास्त प्यावं असं सांगितलं जातं पण खूप पाणी प्यायचे देखील प्रचंड तोटे आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. पाणी जास्त प्यायचा आरोग्याला धोका होऊ शकतो. अनेक गोष्टी होऊ शकतात. काय होतं नेमकं? किती पाणी प्यायला हवं? काय तोटे आहेत पाणी जास्त प्यायचे, जाणून घेऊया...

| Updated on: Sep 05, 2023 | 6:19 PM
1 / 5
मळमळ आणि उलट्या: अति प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो. तुम्हाला मळमळ आणि उलट्या अशा समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला उल्टी सारख्या समस्या जाणवू लागल्या तर समजा की तुम्ही जास्त पाणी पिताय.

2 / 5
डोकेदुखी: पाणी जास्त प्यायलं की सोडियमचे प्रमाण शरीरात कमी होतं, रक्तात जर हे सोडियमचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकेदुखी, अस्वस्थता अशा समस्या सोडियम कमी झालं की जाणवतात आणि हे जास्त पाणी प्यायचे परिणाम आहेत.

3 / 5
सूज: तुम्ही कधी ऐकलंय का की जास्त पाणी प्यायल्यावर सूज येते? होय पाणी अति प्रमाणात प्यायल्यास गुडघा, पाय आणि शरीराच्या विविध भागात सूज येते. हे जास्त पाणी प्यायल्यामुळे होतं.

4 / 5
थकवा: जास्त पाणी प्यायल्यास आरोग्यास अनेक धोके होतात. रोज ३-४ लिटर पाणी प्यावं असं आवर्जून सांगितलं जातं पण त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास थकवा जाणवू शकतो. थकवा असेल तर सुस्ती जाणवते, आळस येतो.

5 / 5
स्नायूंमध्ये क्रॅम्प: आपल्या वाचनात नेहमी येत असतं की पाणी जास्त प्यायल्यास सोडियम कमी होतं. रक्तात सोडियम कमी झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात. स्नायूंमध्ये क्रॅम्प येतात. यासोबतच अशक्तपणा देखील जाणवतो.

Follow Us