Jay Pawar | खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील…जय पवार यांनी व्यक्त केली खदखद!
अशोक खरात प्रकरणावर अनेक जण वक्तव्य करत आहेत. तसेच अनेक नेत्यांचे अशोक खरातसह फोटोदेखील व्हायरल झाले. आता यावर जय पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाले जय पवार?
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. तसेच अनेक नेत्यांचे अशोक खरातसह फोटोदेखील व्हायरल झाले. आता यावर जय पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
यावेळी जय पवार म्हणाले दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातंय. अशोक खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो होते मात्र मुख्यत्वे राष्ट्रवादीतील नरहरी झिरवळ, प्रफुल पटेल तसेच सुनील तटकरे यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून जय पवारांच्या पक्षाबाबतच्या या भावना अगदी योग्य असल्याचं तटकरेंनी सांगितलंय. जय पवार पुढे म्हणाले, “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेेना कोणी वाईट समजून घेऊ नका, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या त्या निर्णयात आपण सगळेच सोबत होतो.”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...

